नगर परिषद मूल ची निवडणूक उद्या 2 डिसेंबर ला
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने यावेळी प्रभाग 5 मध्ये युवा तथा प्रबळ इच्छा शक्ती असलेल्या रीतिक दिनेश गोयल यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या उमेदवाराला दम घ्यावा लागत आहे. याच प्रभागात सौ. भारती गणेश मेश्राम या रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांनी विकासासाठी मत मागत असल्याने जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा मनोदय रितिक गोयल करीत असल्याने अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या रीतीक दिनेश गोयल राजकारणातून समाजकारण करून
समाजातील दिन , दुबळ्या,शोषित व्यक्तींना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. मूल शहर सुंदर शहर व्हावे यातुन शहराचा,प्रभागाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी ते नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरले असल्याने जनतेचा सहभाग उत्तम मिळत आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात मागसपणा आहे. तो मागसपणा दूर करण्यासाठी विविध योजनांचा लाभ देऊन प्रभागाचा कायापालट करण्याचा मनोदय व्यक्त करीत आहे. त्यामुळे
युवकापासून तर आबालवृद्धांपर्यंत रुतिक ला पसंती मिळत आहे. विकास हेच आपले ध्येय असुन काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा आमदार विजय भाऊ वडेट्टीवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रभाग 5 पिंजून काढला असुन काँग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रीतीक गोयल यांचे वडील व्यापारी असले तरी केव्हाही पैशाचा आव आणला नाही. निवडणुकीत येऊन काही आर्थिक लाभ कमविणे हा मुळीच उद्देश नसून मूल शहराचा विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे मत व्यक्त करीत आहे.
रितिक गोयल यांचा प्रचार बघता रीतीक ने प्रचारात आघाडी घेतली असुन
विजयाकडे घोडदौड करीत असल्याची चर्चा एकूण आढावा घेतला असता दिसून येत आहे.
