बेरोजगारांना गंडविणारे ते महाभाग कोण?
जनतेचा सवाल
नगर पालिका मूल येथे विविध पदासाठी जाहिरात व्हॉट अप ग्रुपच्या पाठवुन लोकांचे मत आपल्याकडे वाळविणे व गरजू व्यक्ती असल्याचे दिसून आल्यावर मंत्रालयातील सचिव असल्याचे सांगत नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा मूल मध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. काही समाजसेवकांना याबाबत माहिती होताच नगर परिषदेत याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी मूल नगर पालिकेनी कुठलीही जाहिरात काढली नसुन पद भरतीचे सर्व अधिकारी शासनाला असल्याचे मूल नगर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक करणारे महाभाग कोण? असा सवाल जनतेनी उपस्थित केला आहे.
नगर पालिकेत विविध पदासाठी जाहिरात व्हॉट अप च्या माध्यमातून फिरवुन गरजू व्यक्ती गाठणे व त्यांना नोकरीसाठी रक्कम घेण्याचा सपाटा मूल शहरात सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.अनेकांकडून रक्कम नोकरीचे आमिष दाखविणे सुरू आहे. गोर गरीब व मोल मजुरी करणाऱ्या व्यक्तीच्या मुलांचे लाखो रुपये घेतले आहेत. कुणी शेत जमिनी विकल्या तर कुणी प्लॉट विकुन रक्कम दिल्याचे बोलले जात आहे. याबाबत अनेकांना याबाबत कुणकुण लागताच काही जणांची रक्कम दिली आहे.
मूल येथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये त्रूकॉलर मध्ये नाव बदलवून आपण मंत्रालय मुंबई येथे सचिव पदावर असल्याची क्लिप देखील नाव न सांगण्याच्या अटीवर वाजवुन दाखविली आहे.
याची चर्चा मूल मध्ये चांगलीच रंगली आहे. या घटनेला बळी पडणा-यांनी पोलिस तक्रार दाखल केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधीही मूल नगर पालिकेत मालमत्ता कर पावती घोटाळा उघडकीस येवून चांगलाच गाजलेला होता. त्यानंतर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना 8 ते 12 लाखापर्यंत गंडविणारे महाभाग मूल शहराबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात देखील अनेकांना चूना लावल्याची खमंग चर्चा आहे.हे महाभाग कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाकडून पदभरती बंद असल्याने शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण होत आहे.हाताला काम नसल्याने तरूणांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.कुठे काम मिळेल,नोकरी मिळेल याच्या शोधात उच्च शिक्षित बेरोजगार आहेत.त्याच संधीचा फायदा येथील काही महाभागांनी घेतलेला असल्याचे बोलल्या जाते.नगर पालिकेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे बोलल्या जाते. याबाबत मूल नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना काहींनी भेट घेवून ही बाब निदर्शनास आणून दिली. या घटनेबाबत पालिका प्रशासन सुदधा चक्रावली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी तात्काळ एक प्रसिदधी पत्रक जारी केले आहे.त्यात त्यांनी नगर परिषद आस्थापनेवरील कोणत्याही पदाकरिता पदभरती निघालेली नाही.अथवा प्रस्तावित नाही.नगर परिषद मूल पदभरती संदर्भातील कोणत्याही अनधिकृत सोशल मिडीयावरील मोबाईल संदेश आणि व्हॉटस अॅप वरील बातमीकडे लक्ष देवू नये.असे प्रसिद्ध पत्रकातून नगर परिषद प्रशासनाने कळविले असल्याने यात अनेक युवकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
