बसस्थानक जवळील मामा तलावाच्या पाण्याचा वास येतोय घाणेरडा, नगर परिषद मूल ने लक्ष देण्याची मागणी




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल शहरातील बसस्थानक जवळील असलेल्या  मामा तलावाच्या पाण्याचा घाणेरडा वास येत असून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वासाने शहरातील सर्व नागरीक बेजार झाले असुन नगर परिषद मूल ने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मामा तलावाचे सौंदर्यीकरण गेल्या तीन वर्षापासून रगडले आहे. तलावाचे सौंदर्यीकरण झाले असते तर नौकाविहानामुळे पाण्याची हलचल व देखरेख राहिली असती.मात्र हे काम रगडल्याने तलावाकडे दुर्लक्ष झाले.याचा परिणाम असा झाला की तलावात कुणीही काहीही वस्तू टाकत असल्याने तलावाचे पाणी दूषित झाले असून घाणेरडी वास यायला लागली आहे. या खराब पाण्यामुळे काही मासे देखील मृत्यु पावले असल्याचे दिसून येत आहे. या सौंदर्यीकरणासाठी 3 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित निधी न मिळाल्याने काम रगडले आहे. शासनाने निधी देऊन तलावाचे सौंदर्यीकरण करावे. असे केल्यास त्यावर देखरेख राहून कुणीही घातक वस्तू टाकून तलावाचे पाणी खराब होणार नाही. याकडे नगर परिषद शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.