पोलिसांचे भावनिक आवाहन
याच प्रकाराने मूल ची मुलगी पोहचली आसाम राज्यात !
इंन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॉपचॉट आयडी वरून ओलल्या अनोळखी फेंन्डशिप स्वीकार
केल्याने साक्षी भोयर (वय १८ वर्ष) हिला समोरच्या व्यक्तीकडुन प्रेमाचे जाळयात ओढले . तसेच लग्नाचे आमीष देवुन ब्लॅकमेल करण्यात आले व आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आसाम राज्यात येण्यास भाग पाडले. मात्र मूल पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक प्रमोद चौगुले यांनी मोठ्या शिताफीने
ताब्यात घेऊन वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यामुळे मुलींनो सावधान, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका! असे भावनिक आवाहन मूल पोलिसांनी केले आहे.
चंद्रपूर येथील जानकीराम भोयर यांची मुलगी साक्षी भोयर ही
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे साक्षी भोयर (१८) ही बी. ए. प्रथम वर्षाला शिकते. दिनांक १९ मार्च २०२५ ला महाविद्यालयात जातो म्हणुन घरी सांगुन गेली. मात्र रात्र होऊनही ती घरी परत न आल्याने पोलिस ठाणे मूल येथे हरविल्याची नोंद करण्यात आली.
पोलीस ठाणे प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन
उप अधीक्षक प्रमोद चौगुले यांनी सदर प्रकरणाची दखल घेवुन एक शोध पथक तयार केला.
सदर पथकामध्ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षा नैताम , पोलिस हवालदार भोजराज मुंडरे, संदिप चौधरी यांचा समावेश करण्यात आला. शोधकार्य दरम्यान सदर मुलीकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन सायबर सेल कडुन घेण्यात आले तेव्हा सदर मुलीचे लोकेशन कचर जिल्हा आसाम राज्य येथील आढळुन आले. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचेशी ठाणेदार प्रमोद चौगुले यांनी चर्चा करुन बाहेर राज्यात जाण्याची परवानगी घेवुन आसाम राज्यातील कचर पोलीस अधीक्षक जिल्हा यांचेशी पत्रव्यवहार केला . शोध पथकाला तात्काळ आसाम राज्यात रवाना केले. या दरम्यान आसाम पोलीसांना मुलीचे लोकेशन व फोटो पाठवुन तिला ताब्यात घेण्याबाबत कळविले. शोध पथक दोन दिवसांनी आसाम राज्य येथील कच्चर जिल्हा येथे पोहचुन आसाम राज्याचे कचर येथील पोलीस अधीक्षक माहत्ता व अप्पर पोलीस अधीक्षक रंजित पॉल यांना भेटुन त्यांचे मार्गदर्शनात उदरबोंड पोलीस स्टेशन चे प्रभारी सी-इंम-सिम्स-तिमुंग यांच्या मदतीने साक्षी भोयर हिला ताब्यात घेण्यात आले. व पालकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.पालकांनी आपल्या पाल्याना
इंन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॉपचॉट आयडी वरून ओलल्या अनोळखी फेंन्डशिप स्वीकार करू नये याबाबत समजुन सांगणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध पत्रका व्दारे मूल पोलिसांनी केले आहे.
