सतत गजबज असलेल्या मूल च्या बसस्थानक नजीकच्या तलावात आज दुपारी ४ वाजता महिला तरंगताना आढळली. याबाबत मूल पोलिसांना माहिती होताच मूलचे परिविक्षाधीन उपअधिक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद चौगुले यांच्या आपल्या चमूसह पोहचले. व त्या मृतक महिलेला बाहेर काढले. अधिक चौकशी केली असता त्या महिलेचे नाव शीला शरद मसराम (६०) रा. वार्ड न.६ गडचिरोली असल्याचे कळते. ती मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने उपचार करण्यासाठी गडचिरोली वरून चंद्रपूर ला बसने निघाली. मात्र ती मूल च्या बसस्थानकावर पोहचून हे टोकाचे पाऊल उचलले.शवविच्छेदन करण्यासाठी मूलच्याउपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास मूलचे पोलिस करीत आहेत.
