नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी होत असुन काल नामांकन दाखल करण्याच्या दिवशी काँग्रेस पक्षाने नगराधक्षपदासह सर्व 10 प्रभागात 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरविले आहे. यावेळी प्रथमच काँग्रेस पक्षाने तगडे उमेदवार दिल्याने भाजपला मोठे आव्हान ठरणार आहे. असे बोलल्या जात आहे.
काँग्रेस पक्षाने नगराधक्ष पदासाठी एकता प्रशांत समर्थ यांना उमेदवारी दिली आहे. तर नगरसेवक पदासाठी प्रभाग 1 - अ.ज.महिला - कु. काजल दिपक धारणे, सर्वसाधारण - प्रशांत विलास समर्थ, प्रभाग 2 - ना.मा.प्र.महिला - सौ. पायल सुनिल महाडोरे, सर्वसाधारण - तुकाराम पुंडलीक गुरनूले ,प्रभाग 3 - ना.मा.प्र.महिला - सौ. शालु किशन शेरकी, सर्वसाधारण -मिथून प्रकाश गद्देवार ,प्रभाग 4 - ना.मा.प्र. सर्वसाधारण - राकेश यादवराव रत्नावार, सर्वसाधारण महिला - सौ. उज्वला अंकुश कामडे ,प्रभाग 5 - ना.मा.प्र.महिला - सौ. भारती गणेश मेश्राम, सर्वसाधारण - रितीक दिनेश गोयल,प्रभाग 6 - ना.मा.प्र. सर्वसाधारण - विवेक बळवंतराव मुत्यलवार, सर्वसाधारण महिला- सौ. नलिनी दिनेश आडपवार, प्रभाग 7 - अ.जमाती सर्वसाधारण - अशोक हिरामण येरमे, सर्वसाधारण महिला - सौ. समिक्षा जगदिश कडस्कर, प्रभाग 8 - अ.जाती सर्वसाधारण - अतुल रवि गोवर्धन, सर्वसाधारण महिला - सौ. ज्योती चंद्रकांत चटारे, प्रभाग 9 - अ.जाती महिला - सौ. ललिता सुरेश फुलझेले, सर्वसाधारण श्री. विलास पांडूरंग कागदेलवार, प्रभाग 10 - अ.जाती महिला - सौ.सुशिला डेव्हीड खोब्रागडे, सर्वसाधारण - राहुल सुरेश प्रेमलवार आदींना रिंगणार काँग्रेसने उतरविले आहे. त्यामुळे काँगेस नगराध्यक्षसह सर्व नगरसेवक निवडून येण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली विजयी पताका फडकविण्याचा निर्धार केल्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरुदास गुरुनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी सांगितले आहे.
