मूल नगर परिषद निवडणूक : प्रभाग 1 मध्ये प्रशांत समर्थ यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा !

प्रशांत नावाचे वादळ काँग्रेसला देणार नवसंजीवनी!


रवी वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रशांत समर्थ यांच्या उमेदवारीची शहरात प्रचंड चर्चा रंगली आहे. गेल्या 15 वर्षांत नगरसेवक म्हणून केलेल्या कार्यात त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याचे मतदारांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व काँग्रेसचे काँग्रेसचे महासचिव संतोषभाऊ रावत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ व सर्व २० नगरसेवक विजयासाठी घौडदोळ करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशांत समर्थ यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री नवसंजीवनी देणारी ठरणार अशी चर्चा मतदारात सुरू झाली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या बैठका, जनसंपर्क आणि रोज वाढत जाणारी गर्दी यामुळे समर्थ यांची राजकीय चालना या निवडणुकीत विशेष ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागातील लहानमोठ्या प्रश्नांवर तत्परतेने धावून जाणारा, घरदार सोडून नागरिकांसाठी उपलब्ध राहणारा "जनसेवक" अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे, अशी चर्चा स्थानिकांमध्ये ऐकू येते.



नगर राजकारणात आकर्षणाचे केंद्रबिंदू

प्रशांत समर्थ यांच्या भोवती संपूर्ण निवडणूक फिरताना दिसत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
काँग्रेसने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रभाग 1 तील उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत समीकरणेही बदलल्याचे सांगितले जाते. त्यांच्या उमेदवारीनंतर स्थानिक राजकारण अधिकच रंगतदार बनले असून विरोधकांनीही आपली रणनीती नव्याने आखावी लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


एकता समर्थ यांच्या एन्ट्रीनंतर समीकरणे बदलली
Lकाँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. एकता समर्थ यांच्या प्रवेशानंतर समर्थ दांपत्याबाबतची चर्चा आणखी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या सभांमध्ये समर्थ दांपत्याकडे लक्ष वेधले गेले असून, शहरातील वातावरणात राजकीय तापमान वाढलेले दिसत आहे.

राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी प्रभाग 1 मधील परिस्थतीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, स्थानिक पातळीवर राजकीय आखाडा अधिकच तापताना दिसत आहे.
मतदारसंघातील राजकारण विधानसभा–लोकसभा लढतीसारखे रंगत असल्याची चर्चा शहरभर पसरली आहे.


निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे

प्रशांत समर्थ यांच्या जनसंपर्कातील आक्रमकता, संघटनाचं दीर्घ काम आणि शहरातील गल्ल्यागल्ल्यांतून दिसत असलेली त्यांची उपस्थिती—या सर्वामुळे आगामी मतदानात प्रभाग 1 मध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे.
विरोधकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून, निवडणूक जितकी जवळ येईल तितकीच प्रभागातील परिस्थिती आणखी रंगत होईल, असे चित्र मूल शहरात दिसत आहे.