दाबगाव मक्ता येथे महिला दिनानिमित्य संस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी


 एकता ग्राम संघ दाबगाव मक्ता चा उपक्रम 




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
एकता ग्राम संघ दाबगाव मक्ता च्या वतीने खास महिला दिनाचे ओचित्य साधुन विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषदेचे सदस्य पृथ्वीराज अवताडे यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर तावाडे हे होते. तर विशेष पाहुणे म्हणून सरपंच निर्मला किरमे, उपसरपंच योगिता गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून दे दणका न्यूज चे संपादक रवि वाळके,महात्मा गांधी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष विलास बुरांडे, पंचायत समिती गोंडपिरीचे अभियंता समर्थ उराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गेडाम यादव बुरांडे, पुरुषोत्तम भुरसे, सुभाष चिचघरे, दिलीप गेडाम, महेंद्र किरमे,ग्राम पंचायतीचे सदस्य ममता पिपरे, विद्या बुरांडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बांबोडे, एकता ग्राम संघ दाबगाव मक्ताच्या अध्यक्षा सोनी उराडे आदी उपस्थित होते. यावेळी एकल नृत्य, समुह नृत्य, नाटिका व विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे संचालन रंजनी मेंढे, प्रस्ताविक राजनंदिनी अवताडे तर उपस्थितांचे आभार दिक्षा उराडे यांनी मानले.उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.