जनमाणसात मिसळून काम करण्याची आपली इच्छा - एकता प्रशांत समर्थ !

मूलच्या सर्वांगिण विकासाला प्रथम प्राधान्य !



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
    
   नगराध्यक्ष पदासाठी शिक्षण महत्वाचे असले तरी,जनमाणसात मिसळून काम करण्याची इच्छाशक्ती तेवढीच महत्वाची आहे.ती इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास माझ्यामध्ये असल्याने नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचे मत येथील कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केले.येथील मिडीया सेंटरशी बोलताना त्यांनी मूलच्या सर्वांगिण विकासाला प्रथम प्राधान्य असल्याचे जाहीर केले.भाजपाच्या सत्ताकाळातील  पाच वर्षातील विकास कामाचे धिंडवडे निघत आहे. स्वच्छ मूल सुंदर मूल या ब्रिद वाक्याला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने आज मूल शहराची दयनीय अवस्था झाली आहे.मात्र,कॉंग्रेसची सत्ता आल्यास मूल शहराच्या विकास कामांना प्रथम प्राधान्य दिल्या जाईल.नागरिकांच्या मनातील मूल,वार्डा वार्डातील विकास,मूलभूत सोयी,स्वच्छ पिण्याचे पाणी या गोष्टींना प्रथम प्राधान्य राहणार आहे.म्हणूनच कॉंग्रेसने वचननामा सादर केलेला आहे.त्या वचननाम्यानुसार सर्व गोष्टींना पर्ण करण्याचा माझा निर्धार असल्याचे एकता समर्थ यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या अडीअडीचणी सोडविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.खास महिलांसाठी शहरात स्वच्छता गृह उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे एकता यांनी स्पष्ट केले.