मूल नगर परिषद निवडणूक : 2025 प्रभाग 4 मध्ये राकेश रत्नावार यांची विजयाकडे घोडदौड!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
     नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या उद्या 2 डिसेंबरला असुन प्रभाग क्रमांक 4 मधुन नागरिकांच्या मागास प्रवर्गातून सर्वसाधारण गटातून रिंगणात असलेले राकेश यादवराव रत्नावार यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन विजयाकडे घोडदौड करताना दिसत आहेत. त्यांच्या सोबतीला सर्वसाधारण गटातून असलेल्या  सौ. उज्वला अंकुश कामडी यांनी देखील  प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग 4 मधुन दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
      राकेश रत्नावार हे माजी नगर परिषदेचे उपाध्यक्ष असुन त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नगर विकासासाठी भरीव कार्य केले आहे. त्यामुळे आजही त्यांची जनमानसात प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे त्यांचा विजय पक्का समजला जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नगर परिषद मूलच्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार तगडे दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षात हलचल पसरली असल्याचे दिसते. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे महासचिव संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शाखाली
राकेश रत्नावार व इतर प्रभागातील उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे. इतरांचा प्रचार करीत आपला देखील प्रचार त्याच ताकतीने करून आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

 दोन्ही उमेदवार सक्षम असुन प्रचारात आघाडी घेतली आहे.  नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट असल्याने यासाठी नगर परिषदेचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत समर्थ यांच्या सहचारिणी सौ. एकता प्रशांत समर्थ या रिंगणात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून एकहाती सत्ता असल्याने जनता कंटाळली आहे. त्यामुळे आता बदल हवा अशी जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. राकेश रत्नावार हाच बदल घडून आणण्यासाठी रत्नावार प्रयत्नरत दिसत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगर परिषद मूल च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या वचन नाम्यात सत्ता हाती येताच पूर्तता करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकूण प्रचार पाहता  नगराधक्षसह उमेदवारासह राकेश रत्नावार व उज्वला कामडी व सोबतीचे अनेक नगरसेवक निवडून येणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.