नगराध्यक्ष पदासाठी काँगेसकडून एकता प्रशांत समर्थ यांनी दाखल केला अर्ज




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
   
नगर परिषद मूल होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी एकता प्रशांत समर्थ यांनी आज नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मृदुला मोरे यांचेकडे सादर केला. यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, नगर परिषद मूल चे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, माजी सभापती प्रशांत समर्थ, दिनेश गोयल आदी उपस्थित होते. तसेच यावेळी नगरसेवक पदासाठी प्रशांत समर्थ, ऋतिक दिनेश गोयल यांनी देखील अर्ज दाखल केला आहे.
   काँग्रेसच्या वतीने उद्या दिनांक 17 नोव्हेंबर ला 
   नगरपरिषद मूल निवडणूकी करिता पक्षाच्या उमेदवारांचे  उर्वरित नामांकन अर्ज  काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटनीस  संतोषसिंह रावत  यांच्या  सकाळी 11:00 वाजता भव्य रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
 पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या   १०० कार्यकर्त्यांसह सकाळी 11:00 वाजेपर्यंत  काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुदास गुरुनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केले आहे