भाजपाच्या खेळीवर मांडली जाणार पुढील गणिते!
मूल नगर परिषदेची निवडणूक यावेळी रंगतदार व चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी सत्ता परिवर्तन व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा बोलबाला असुन त्यासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. मात्र भाजपा येत्या काही दिवसात काय खेळी खेळून गणिते मांडते हे येणाऱ्या काही दिवसातच दिसणार आहे.
मूल नगर परिषदेची 2 डिसेंबर ला होणारी निवडणूक चुरशीची तितकीच रंगतदार होण्याची शक्यता एकुण चाललेल्या चर्चेतून दिसुन येत आहे. मूल च्या राजकारणात आजपर्यत काँग्रेस भाजपा अशीच लढत झाल्याचे बघायला मिळत आहे. आणि यावेळी देखील तेच समीकरण असणार आहे. सध्या स्थितीत नगराधक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या
काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ भाजपाच्या किरण किशोर कापगते यांनी त्या त्या प्रभागाच्या उमेदवारासोबत मतदाराच्या भेटी घेणे सुरू आहे.
काँगेसने यावेळी नगराधक्षसह नगरसेवकांचे उमेदवार तगडे दिल्याने भाजपला देखील तेवढी ताकद लावणे आवश्यक झाले आहे.
काँग्रेसच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांना नवीन असल्या तरी त्यांचे पती गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असल्याने विकासाची परिभाषा त्यांना माहीत झाली आहे. आणि त्या पूर्णवेळ नगर परिषदेत देऊ शकतात मात्र भाजपच्या उमेदवार किरण किशोर कापगते ह्या सावली येथे प्राध्यापिका असल्याने त्या पूर्णवेळ देण्यास असमर्थ ठरणार अशी चर्चा जनमानसात सुरू झाली आहे.
काँग्रेसने सुरू केलेल्या
प्रचाराचा झंझावात भाजपा किती दमाने रोखते हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे.
जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा प्रचार शिगेला पोहचणार आहे. एकंदरीत कोण बाजी मारेल हे येणाऱ्या 3 डिसेंबरला कळणार आहे. मात्र सध्या तरी काँग्रेसचा बोलबाला दिसुन येत आहे.
