काँग्रेसचा उमेदवार ठरला, भाजपा केव्हा व कोण? आता नगराध्यक्षाचा रंगणार सामना !



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

नगर परिषद मूल च्या निवडणुकीचे वातावरण तापायला लागले असून सर्वच १० ही प्रभागात भावी उमेदवार नगरसेवक होण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. त्यातच भाजपा काँग्रेस या मुख्य लढतीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण ? यावर मूल शहरात चर्चा सुरू असताना नगर परिषद मूल चे माजी सभापती तथा भाजपचे नेते प्रशांत समर्थ यांनी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एकता प्रशांत समर्थ या असणार हे स्पष्ट झाले आहे. आता भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण? यावर चर्चा सुरू झाली आहे. यात किरण कापगते, माधुरी करकाडे, शिवानी आगडे व विद्या बोबाटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा कुणाला उमेदवारी देतात यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
  नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहे. उमेदवारी फॉर्म दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत असुन 25 नोव्हेंबर पर्यंत  उमेदवारी मागे घेणे आहे.26 नोव्हेंबर पासुन खऱ्या प्रचाराला सुरवात होणार आहे. यावरुन प्रचाराला फक्त 5 ते 6 दिवस मिळणार आहेत. याच दिवसात खरा प्रचार होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा चेहरा एकता प्रशांत समर्थ यांच्या रूपाने समोर आणला आहे. भाजपा कोणता चेहरा आणणार? यावर खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आजपर्यत भाजपाने  माळी, कुणबी समाजाच्या महिलाना नगराधक्ष पदासाठी उमेदवारी दिल्याने मोठा समाज असलेल्या तेली समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी होताना दिसत आहे. असे झाले तर तेली समाजातून माधुरी करकाडे व शिवानी आगडे यांचे नाव समोर येऊ शकते. या दोन नावावर चर्चा झाल्यास माधुरी करकाडे यांचे पती  भाजपाचे नेते असून  असुन ते माजी सभापती देखील राहिले आहेत. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठतेचा विचार माधुरी करकाडे यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास एकता प्रशांत समर्थ व माधुरी महेंद्र करकाडे अशी दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपा कुणाला उमेदवारी देतात यावरूनच खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.