नगर परिषद मूल ची मागील निवडणूक भाजपा काँग्रेसमध्ये झाली होती मुख्य लढत!





रवी वाळके/दे दणका न्यूज मुल

नगर परिषद मूल ची 
मागील पार पडलेली निवडणूक चुरशीची झाली होती. यावत भाजपा व काँग्रेस उमेदवारात काट्याची लढत बघायला मिळाली होती. यात नगराध्यक्षासह भाजपचे १७ पैकी १६ नगरसेवक निवडून आले होते. यात काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे २७ नोव्हेंबर २०१६ ची निवडणुक चुरशीची ठरल्याचे दिसते.
   मूल नगरपरिषदेची मागील निवडणूक थेट जनतेतून नगराध्यक्ष यांना निवडून द्यायचे होते. यावेळी भाजपच्या रत्नमाला भोयर यांनी काँग्रेसच्या लीना चिमड्यालवार यांचेवर ३५६७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता. रत्नमाला भोयर यांना ७४०५ तर लीना चिमड्यालवार यांना ३८३८ मते पडली होती. तसेच नगरसेवक पदासाठी देखील भाजपा काँग्रेस अशी लढत बघायला मिळाली होती. यात 
प्रभाग १ मध्ये भाजपाचे विनोद सिडाम यांनी काँग्रेसचे रविकांत चौधरी यांचा १८१ मतांनी पराभव केला. यावेळी सिडाम यांना ९३५ तर चौधरी यांना ७५४ मते पडली होती. याच प्रभागात भाजपच्या रेखा येरणे यांनी काँग्रेसच्या वंदना कामडे यांचा १०१ मतांनी पराभव केला. यावेळी येरणे यांना ८६६ तर कामडे यांना ७६५ मते मिळाली होती. प्रभाग २ मध्ये भाजपच्या शांता मांदाडे यांनी काँग्रेसच्या वंदना मोहुले यांचा १४१. मतांनी पराभव केला. यावेळी मांदाडे यांना ८७० तर मोहुले यांना ६२९ मते पडली होती. याच प्रभागात माञ भाजपच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. यात काँग्रेसचे विनोद कामडी यांनी भाजपचे अनिल संतोषवार यांचा १०१ मतांनी पराभव केला. यावेळी कामडी यांना ८०७ मते तर संतोषवार यांना ७०६ मते पडली .या एकमेव भाजपच्या जागेसाठी क्रास व्होटिंग झाल्याचे बघायला मिळाले. प्रभाग ३ मध्ये भाजपच्या वनमाला कोडापे यांनी काँग्रेसच्या भुमिका मडावी यांचा ७०४ मतांनी पराभव केला. यावेळी कोडापे यांना १०४६ तर मडावी यांना ३४२ मते पडली होती. याच प्रभागात भाजपचे प्रशांत समर्थ यांनी काँग्रेसचे अशोक आक्केवार यांचा ७१५ मतांनी पराभव केला. समर्थ यांना १००५ तर अशोक आक्केवर यांना २९० मते पडली होती. प्रभाग ४ मध्ये भाजपच्या विद्या बोबाटे यांनी काँग्रेसच्या गिता भोयर याचा ५९४ मतांनी पराभव केला होता. यावेळी बोबाटे यांना १०४८ तर भोयर यांना ४५४ मते पडली होती. याच प्रभागात भाजपचे अनिल साखरकर यांनी काँग्रेसचे श्रीकांत पोरेद्दीवार यांचा ३४४ मतांनी पराभव केला. यावेळी साखरकर यांना ९०९ तर पोरेडीवार यांना ५६५ मते मिळाली होती. प्रभाग ५ मध्ये भाजपाचे नंदकिशोर रणदिवे  यांनी काँग्रेसचे विवेक मुत्यालवार तर याच प्रभागातील भाजपाच्या आशा गुप्ता यांनी काँग्रेसच्या निर्मला अडगुलवार यांचा पराभव केला. या प्रभागाचा निकालाबाबत रीट याचिका दाखल केल्याने निवडणुकीदरम्यान अटीततिची परिस्थीती निर्माण झाली होती.
प्रभाग ६ मध्ये भाजपच्या संगिता वाळके यांनी रॉकाच्या सुजाता बरडे यांचा ३१८ मतांनी पराभव केला. यावेळी वाळके यांना ६७८ तर बरडे यांना ३६० मते पडली. याच प्रभागात भाजपाचे प्रशांत लाडवे यांनी रॉकाचे राकेश ठाकरे यांचा ३४४ मतांनी पराभव केला. लाडवे यांना ७१० तर ठाकरे यांना ३६६ मते पडली. प्रभाग ६ मध्ये काँग्रेसचे उमेदवार बाबा अझीम व पूजा रामटेके हे उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेली. प्रभाग ७ मध्ये भाजपच्या वंदना वाकडे यांनी काँग्रेसच्या दीपमाला गेडाम यांचा ३०५ मतांनी पराभव केला. यावेळी वाकडे यांना ७७४ तर गेडाम यांना ४६९ मते पडली. याच प्रभागात भाजपाचे महेंद्र करकाडे यांनी काँग्रेसचे चंद्रकांत चतारे यांचा १३२ मतांनी पराभव केला. यावेळी करकाडे यांना ६२३ तर चतारे यांना ४९१ मते पडली. प्रभाग ८ मध्ये भाजपाचे मिलिंद खोब्रागडे यांनी काँग्रेसचे शंम्मीकांत डोर्लीकर यांचा १७२ मतांनी पराभव केला. यावेळी खोब्रागडे यांना ८६१ तर डोर्लीकर यांना ६८९ मते पडली होती. याच प्रभागात भाजपच्या प्रभा चौथाले यांनी काँग्रेसच्या अर्चना चावरे यांचा अवघ्या ७६ मतांनी पराभव केला होता. यावेळी चौथाले यांना ८५४ तर चावरे यांना ७७८ मते पडली होती. याच प्रभागातील तिसऱ्या उमेदवार भाजपच्या मनीषा गांडलेवार यांनी काँग्रेसच्या वर्षा पडोले यांचा २७२ मतांनी पराभव केला. यावेळी गांडलेवार यांना ९०८ तर पडोळे यांना ७२३ मते पडली होती. आजच्या घडीला ९ वर्षाचा काळ लोटला असल्याने यात बदल घडतो की पुन्हा भाजपा सत्तेत येते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीसाठी भाजपा मध्ये रस्सीखेच दिसत आहे.काँग्रेस बरोबर इतरही पक्ष मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसत आहे. या सर्वांचा आटापिटा 
 ३ डिसेंबरला सर्वांना माहिती होणार आहे.