जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही-

खासदार प्रतिभा धानोरकर      




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
नगर परिषद मूलच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असुन भाजपाला मत देण्यासाठी क्षेञाचे आमदार जनतेला धमकी देत आहे. या धमकीला भिक न घालता काँग्रेसला मतदान करा. अशी विनंती चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेञाच्या खासदार प्रतिभाताई धारणे यांनी केली. झालेल्या सभेत बोलतांना खा. प्रतिभा धानोरकर यांनी मूलची जनता सुज्ञ असुन रस्ते, नाल्या आणि इमारत बांधकाम म्हणजे विकास नसुन मिळणाऱ्या सोयी आणि सुविधा विषयी जनतेला अभ्यास आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता याचा विचार करणार असुन मूल शहरातील मतदारांची मजबुत फळी सत्ताधाऱ्यांचा माज उतरविण्यास सक्षम असल्याने मतदारांप्रती आभार व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिवा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी यावेळी जनता यावेळेस नगर परिषदेत परिवर्तन घडवुन आणणार असुन शहराचा सर्वागिण विकास करण्यासाठी जिल्ह्याच्या खासदार आणि विधिमंडळाचे काँग्रेसचे तीन आमादार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगीतले. सभेपुर्वी मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता उभे असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ  भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत खलनायक पुष्पा यांनी रॅलीच्या माध्यमातून मूल नगरातील मतदान व नागरिकांना आपल्या अभिनयाने वंदन करुन  मतदारांना आकर्षित केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय            चिंमड्यालवार, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, न.प.चे माजी सभापती प्रशांत समर्थ, बाबा अझीम यांचेसह नगराध्यक्षांच्या उमेदवार एकता समर्थ, दहा प्रभागाचे वीस उमेदवार, ज्येष्ठ पदाधिकारी राजुपाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, गुरु चौधरी, बंडू गुरनुले, पवन नीलमवार, आकाश दहीवाले, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, नलिनी आडपवार, समता बनसोड व काँग्रेसचे शहर व ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शहराध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.