स्वर्गीय कन्नमवार पुण्यतिथी दिनी व्यक्त झाल्या समाज भावना !
मूल शहरात बेलदार समाजाचे ४५७ घर आणि ३००० च्या वर मतदार असतांना होवु घातलेल्या मूल नगर परीषद निवडणुकीत भाजपाने बेलदार समाजाच्या एकाही व्यक्तीला उमेदवारी देण्याचे सौजन्य दाखवु नये. ही खेदाची बाब असुन काँग्रेस पक्षाने एक नव्हे तीन बेलदार समाज बांधवांना उमेदवारी देवुन समाजाचा सन्मान केला. या बाबीचा बेलदार समाजाने गांभीर्याने विचार केला पाहीजे. त्यामुळे बेलदार समाजात नाराजीचा सूर असल्याचे मत जिल्हा संयोजक राजेंद्र कन्नमवार यांनी व्यक्त केले आहे.
स्थानिक काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या कर्मवीर स्व. मा.सां.कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात राजेंद्र कन्नमवार बोलत होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक काँग्रेस भवन येथे आज स्व. कर्मवीर कन्नमवार यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा स्थानिक काँग्रेस नेतृत्व संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात बोलतांना राजेंद्र कन्नमवार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतांना स्व. मा.सां.कन्नमवार यांनी वर्तमान पञ घरोघरी वाटप करून देशात उंची गाठली . त्यांनी केलेले कार्ये आणि निर्णायक भुमीका चंद्रपूर जिल्हावासीयांना अविस्मरणीय असुन त्यांनी बेलदार समाजाची राज्यात शान आणि बाण राखली आहे. त्यामूळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणे बेलदार समाजाचीच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक राजकारण्यांची जबाबदारीही असल्याचे सांगीतले. यावेळी संतोषसिंह रावत यांनी कन्नमवारजींच्या कार्यावर प्रकाश टाकुन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चिंमड्यालवार, तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, शहरध्यक्ष सुनील शेरकी, बाजार समिती संचालक तथा बेलदार समाजाचे तालुका अध्यक्ष संदीप कारमवार, प्रशांत समर्थ, किशोर घडसे, जेष्ठ नेते बंडूभाऊ गुरनुले, विवेक मुत्यलवार, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, ऋतिक गोयल, भारती मेश्राम, बोरकर आदी यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
