काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ यांनी घेतली प्रचारात आघाडी!



l
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल नगर परिषदेची येत्या 2 डिसेंबर ला होणारी निवडणूक चुरशीची तितकीच रंगतदार होण्याची शक्यता एकुण चाललेल्या चर्चेतून दिसुन येत आहे. मूल च्या राजकारणात आजपर्यत काँग्रेस भाजपा अशीच लढत झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे ही देखील काट्याची होईल अशी शक्यता आहे. मात्र सध्या स्थितीत काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ यांनी भाजपाच्या किरण किशोर कापगते यांनी आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे.
काँगेसने यावेळी नगराधक्षसह नगरसेवकांचे उमेदवार तगडे दिल्याने भाजपला देखील तेवढी ताकद लावावी लागत आहे. मात्र काँग्रेसचे उमेदवार तगडे असल्याने तेवढी मेहनत घ्यावी लागत नसल्याचे बोलले जात आहे. काँगेस व भाजपा उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचार सुरू असून आपण व आपला पक्ष किती सक्षम हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून होताना दिसत आहे. 
 
          बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला मूल तालुका माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा गृहक्षेत्र असल्याने नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी बारीक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या 15 वर्षात मूल शहर व तालुक्यात केलेला सर्वांगीण विकास बघता नगर परिषदेत भाजपची सत्ता हवी असे काही नागरिकांना वाटत आहे. आमदार असल्याने राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकास निधी आणणे सोईचे होते असे अनेकांचे मत आहे. तर काहीच्या मते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे बघुन नागरिकांनी तिसऱ्यांदा आमदार करीत नगर परिषदेच्या केंद्रस्थानी बसविले. आमदार सक्षम आहेत मात्र निवडून येणारे उमेदवार पाच वर्षापर्यंत कुठलाही विकासाचा अजेंडा राबविला नाही. युवकांना स्वयंरोजगार निर्मिती होईल यासाठी आमदाराकडे नव्या प्रकल्पाच्या संकल्पना मांडणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही.13 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या व्यापारी संकुलात बेरोजगार युवकांना कमी दरात दुकान गाळे देता येईल यासाठी प्रयत्न झाला नाही. आजच्या घडीला व्यापारी संकुलाची दुरावस्था दिसत आहे. मात्र त्याकडे कुणाचाच लक्ष दिसत नसल्याने जनतेत रोष निर्माण होताना दिसत आहे.प्रचारादरम्यान भाजपाच्या उमेदवारांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे 
 सत्ताबदल हवी असाही सूर उमटनाना दिसत आहे. हाच धागा पकडत काँग्रेसने प्रचार चालविला आहे. काँग्रेसच्या
 प्रचाराचा झंझावात भाजपा किती दमाने रोखते हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे.
 जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा प्रचार शिगेला पोहचणार आहे. एकंदरीत प्रचाराच्या झंझावता कोण बाजी मारेल हे येणाऱ्या 3 डिसेंबरला दिसणार आहे. असे असले तरी सध्या तरी काँग्रेसने सुरू केलेल्या प्रचारात आघाडी दिसुन येत आहे.