भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने होऊ घातलेल्या नगर परिषद मुल सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर विधानसभेचे आमदार, माजी मंत्री, सर्वांचे लाडके नेते, विकासपुरुष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 ला सायंकाळी 7:00 वाजता रामलीला भवन मुल च्या पटांगणात आयोजित केलेली आहे. या जाहीर सभेला भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. हरिशजी शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गुरनुले,बल्लारपूर विधानसभा संघटन प्रभारी श्री.रामजी लाखिया यांची उपस्थिती राहणार आहे.या सभेला सर्व भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठया संख्येने
उपस्थित असे आवाहन भारतीय जनता पार्टी मुल शहर अध्यक्ष प्रविण मोहूर्ले यांनी केले आहे.
