समाजात गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाला प्रयत्न !

भाजपा नेत्याच्या भेटीचे शोभाताईंनी केले खंडन !




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

  भाजपाने मूल नगर परिषदेच्या  नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणुन   किरण कापगते यांना दिली असे असताना  उमेदवारीचे खापर स्थानिक भाजपाच्या काही नेत्यांनी आपल्यावर फोडले असून शोभाताईंनीच किरण कापगते यांना उमेदवार मिळवुन दिली ही चर्चा निरर्थक असून  आपण आजारपणा मूळे मागील काही दिवसांपासून विश्रांती घेत आहे. त्यामुळे कुणाच्या 
 भेटीगाठी घेणे बंद आहेत. त्यामूळे किरण कापगते हयांना उमेदवारी कोणाच्या माध्यमातुन मिळाली. याची आपल्याला कल्पना नाही. समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
असे मत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मत पत्रकारांसमोर  व्यक्त केले.
 
  भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी 
मूल येथील भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी  प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी मिळवुन दिली. असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी भाजपची असुन 
   भाजपाचा प्रचार करेन.  कापगते यांना उमेदवारी कोणामुळे मिळाली याबद्दल मला माहिती नाही. आजारी असल्यामुळे मागील काही दिवसांपासून कोणालाही भेटलेली नसून कोणाच्याही उमेदवारी करीता कोणाही कडे प्रयत्न केलेले नाही. उगीच आपल्या नांवाने वावडया उठवल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. नगरगांव येथील सदानंद बोरकर तीन महिण्यापुवी माझ्या भेटीला आले होते. नवरगांव येथील एका शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळयाच्या उद्घाटना करीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मागुन दयावी. अशी विनंती त्यांनी केली. तेव्हाच आपण मुख्यमंत्रयाशी संपर्क साधून सदानंद बोरकर यांचेशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यानंतर त्यांचेशी आपली कधीही भेट किंवा बोलणे झालेे नसल्याचे शोभाताई फडणवीस यांनी सांगीतले.

इंजि. शिवाणी आगडे यांना मूल नगर पालीकेची उमेदवारी जाहिर झाल्याची चर्चा सुरू असतांनाच एक दिवसापूर्वी प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी जाहिर झाली, प्रा. किरण कापगते यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी त्यांनी स्थानिक भाजपा नेत्या तथा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यामूळे या सर्व घडामोळीवरून आपल्या भेटीचा वेगळा अर्थ काढून समाजा समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचेही त्यांनी फडणवीस यांनी सांगितले.