निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखत पक्षाने काँगेस पक्षाने दिली आहे उमेदवारी !



काँगेस पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा!





रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

काँग्रेस पक्ष सामाजिक विचार धारा मानणारा पक्ष असुन दिन, दलीत, शोषित वंचिताना मानणारा आहे. त्यामुळे 
 राजकीय वर्तुळांतून जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांनुसार—मूल काँग्रेसमध्ये बंडाचे सूर, नाराजी उसळली, निष्ठावंत कार्यकर्ते दुर्लक्षित —अशी एकतर्फी माहिती प्रसारित केली जात आहे. मात्र वस्तुस्थिती याच्या विरूध्द  असल्याचे मत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.


काँग्रेस  पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
पक्षाने गेल्या महिनाभरापासून गोपनीय सर्वे, जनमत, क्षेत्रनिहाय आढावा, स्थानिक घटकांचे विश्लेषण,जनतेची पसंती,आणि जिंकण्याची क्षमता यावर आधारित विस्तृत अहवाल तयार केला होता. या सर्वेक्षणात प्रशांत समर्थ यांचे नाव सर्वोच्च प्राधान्य क्रमात आल्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजेच उमेदवारी ही “नुकतेच आले म्हणून नाही”,
तर “जिंकण्याची क्षमता सिद्ध केली म्हणून” काँग्रेसच्या जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून देण्यात आली. त्यामूळे निष्ठावान कार्यकर्ते दुखावलेले, या म्हणण्यात अर्थ नसुन — उलट कार्यकर्त्यांचेच मत पक्षाने मान्य केल्याने सर्व कार्यकर्ते समाधानी असल्याचा दावा तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केला आहे.
“आमचे कार्यकर्ते कोणत्याही निर्णयाच्या विरोधात नाहीत. निर्णय हा त्यांच्या अभिप्रायावरच आधारित असल्याचे सांगतांना काँग्रेसच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्याने अनेक प्रभागांमधील कार्यकर्त्यांनी स्वतःच प्रशांत समर्थ यांचं नाव पुढे केल्याने समर्थ दाम्प्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करत उमेदवारी जाहीर केली. समर्थ यांची प्रतिमा, नागरिकांशी असलेला थेट संपर्क, आणि विविध सामाजिक उपक्रमातील सक्रिय सहभाग यामुळे ते विजयी उमेदवार म्हणून उभे राहत असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात निघाल्याने विरोधक धास्तावले असुन पराभवाच्या भितीपोटी बिनबुडाचे आरोप लावल्या जात असल्याचेही त्यांनी सांगीतले.
 भाजपातून येणारा प्रत्येक जण संधीसाधू नसतो, भाजपच्या कार्यशैलीला कंटाळून अनेक कार्यकर्ते विचार धारेने काँग्रेसकडे परत येत असुन प्रशांत समर्थ यांच्या बाबतीतही हेच घडले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगीतले.
त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक क्षेत्रांत केलेले काम पाहता, त्यांची उमेदवारी क्षमता आणि जनाधार यावरच आधारित असल्याचे स्पष्ट केले जात आहे.


“काँग्रेसमध्ये बंड फुटले, कार्यकर्ते नाराज आहेत, पक्षात असंतोष आहे—हे सर्व खोटे आणि निव्वळ विरोधकांचे नैराश्यजन्य राजकारण आहे.” ज्या प्रभागांत उमेदवारी जाहीर झाली, त्या प्रभागांत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात बैठक,
संघटनात्मक तयारी, आणि घराघरात भेटी सुरू झाल्या आहेत. हे चित्र पूर्णपणे वेगळे असल्याने विरोधक जाणूनबुजून नकारात्मक प्रचार करत असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर—
काँग्रेसच्या बैठका गजबजल्या,
कार्यकर्ते अधिक सक्रिय झाले,
अनेक नवीन स्वयंसेवक जोडले गेले,
महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसू लागली.
म्हणजेच “काँग्रेस उफाळली” हा आरोप खरा आहे पण
उफाळली नाराजीने नाही  तर उत्साहाने आहे असे परखड मत काँग्रेसचे नेते व्यक्त करताना दिसत आहेत.

“उमेदवारी ही कोणाला खूष करण्यासाठी नाही.
आम्ही क्षमता, लोकप्रियता आणि जिंकण्याची ताकद पाहतो. त्यामुळे काँगेस पक्ष मूळ विचारधारा धरून  लढत असल्याने मतदारांचा जनाधार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.त्यामुळे काँगेस पक्ष अधिक अधिक मजबूत होताना दिसत आहे.