नगराध्यक्ष पदासाठी भाजपा व काँग्रेस उमेदवारात होणार काट्याची लढत! लढतीकडे लागले सर्वांचे लक्ष



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
  
  नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबर ला होणार असून आज नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजपा कडून किरण किशोर कापगते तर काँग्रेस कडून एकता प्रशांत समर्थ यांनी अर्ज दाखल केला आहे. आज पर्यंत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप काँगेस अशी काट्याची लढत बघायला मिळाली होती. तीच काट्याची लढत एकदा पुन्हा बघायला मिळणार अशी चर्चा मतदारात सुरू झाली आहे.


 नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने भाजपातून काँग्रेस मध्य प्रवेश केलेल्या एकता प्रशांत समर्थ यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर भाजपने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून बरीच स्पर्धा चालली असल्याचे दिसुन आले होते. प्रथम 
 शिवानी संदीप आगडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे नाराज झालेल्या 
 किरण किशोर कापगते आपली शक्तीपणाला लावुन आपणाकडे उमेदवारी खेचून घेतली पूर्वाश्रमीच्या भाजपाच्या व आताच्या काँगेसवासी झालेल्या एकता समर्थ व भाजपाच्या किरण कापगते यांच्या थेट लढत बघायला मिळणार आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मूल तालुक्यात विधानसभा असो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत भाजपा काँग्रेस अशीच लढत बघायला मिळते. यात तिसरी आघाडी ससफेल ठरल्याचे आजपर्यत दिसुन येत आहे. याच बरोबर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या टीना ठाकरे, शिंदे गटाच्या भारती राखडे तर बसपाच्या चैताली मंद्रीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे कुणाचे मते कमी करणार हे येणाऱ्या २ डिसेंबर ला कळणार आहे. एकंदरीत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप काँगेस उमेदवारात खरी लढत बघायला मिळणार आहे.