दाबगाव मक्ता येथील शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी !





रवि वाळके/दे दणका न्यूज 


तालुक्यातील  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबगाव मक्ता येथे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची दिवाळी सुट्यांमध्ये घडली असून विद्यार्थ्यांना 
 पिण्याचे पाणी व इतर वापराकरीता शाळेच्या परिसरात बोअरवेल व नळ फिटिंगची तोडफोड अज्ञात व्यक्तीने केल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरांचा शोध लावण्याची मागणी जनतेनी केली आहे.


         विदयार्थ्यांची सुरक्षा व्हावी व इतर सोयी मिळण्याच्या दृष्टीने शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे, बोअरवेल व नळाची फिटिंग करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्या दिनांक १६ ऑक्टो. २०२५ ते ३० ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत शाळेला  होत्या. या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी उर्वरीत दोन सीसीटिव्ही कॅमेरे व पूर्ण नळ फिटिंग बोअर सहित तोडफोड करून परत नुकसान केले आहे. यापूर्वी देखील अशीच तोडफोड केली होती.आतापर्यंत अंदाजे ६० हजाराचे वर नुकसान करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळेला पूर्वीच तुटपुंजे अनुदान मिळत असते. शाळेतील सहकारी शिक्षक रक्कम गोळा करून विद्यार्थ्यांना सोयी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र विघ्नसंतोषी लोकांमुळे शिक्षणासारख्या पवित्र असलेल्या इमारतीत लावलेल्या वस्तू चोरून नेतात. ही लाजिरवाणी बाब आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष घालून अज्ञात चोराचा तपास करण्याची मागणी जनतेनी केली आहे.