मूल नगर परिषदेची निवडणुक येत्या 2 डिसेंबर ला होत असुन
प्रभाग क्र. 9 मध्ये रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार पत्रकार सतीश आकुलवार यांचा प्रचार जोरात सुरू आहे.
सतीश आकुलवार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत लोकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढे येत असल्याची ओळख प्रभागात घट्ट झाली आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये “आपला माणूस, नेहमी उपलब्ध असलेला नेता” अशी प्रतिमा असलेल्या सतीश आकुलवार यांच्या बाजूने मतदार कौल देताना दिसत आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न सतीश आकुलवार करीत आहेत. त्यामुळे हे निवडून आल्यास आपली कामे होतील असा विश्वास असल्याने मतदार कौल देताना दिसत आहे. मात्र येणाऱ्या दिवसात कोणते चित्र बघायला मिळेल हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.
