नगर परिषद मूल निवडणूक : प्रभाग 9 मध्ये प्रशांत मार्कंडी लाडवे रिंगणात!


विकासाचा ध्यास घेणारे  व्यक्तिमत्व म्हणून परिचित!


रवि वाळके / दे दणका न्यूज मूल 

 नगर परिषद मूलची येत्या 2 डिसेंबरला  निवडणूक होत आहे.  प्रभाग क्रमांक 9 ब सर्वसाधारण साठी राखीव असून मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले प्रशांत मार्कंडी लाडवे हे परिचित व्यक्तिमत्व आहे. प्रशांत लाडवे यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कार्याची दखल घेत  उमेदवारी दिल्याने जनतेनी समाधान व्यक्त केले  आहे . सतत कामात तत्पर असलेला कार्यकर्ता म्हणून प्रशांत मार्कंडी लाडवे  हे मूल शहरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हे निवडून आल्यास आपली कामे त्वरित होतील असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत.
    
     प्रशांत मार्कंडी लाडवे हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. गेल्या 10 वर्षात त्यांनी वॉर्ड विकासाला चालना दिली आहे. वार्डातील युवकांना शरीरयष्टी व्यवस्थीत करता यावी व भावी पिढी सुदृढ व्हावी यासाठी त्यांनी व्यायाम शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शाळेत अनेक युवक जाऊन क्रीडा क्षेत्रात आपले नाव उज्वल करताना दिसत आहेत. याच बरोबर ओपन स्पेसचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नागरिकांना नळाचे मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी नळाची पाईप लाइन टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजच्या घडीला नागरिकांना पाणी उपलब्ध झाले आहे. नाल्या व रस्ते होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे यावेळी वार्डातील अनेक निकाली निघाल्या आहेत.

 

गरजू, दिन दुबळ्या व्यक्तींना  मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, रुग्णांना मदत असो वा शैक्षणिक सुविधा—ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहत असल्याने त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभाग 9 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी तिसऱ्यांदा  रिंगणात उतरत आहे,” असे सांगत प्रशांत लाडवे यांनी विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. नागरिकांना  सार्वजनिक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात त्यांचा हातखंड असल्याने नक्कीच विकास साधला जाणार असा जनतेला विश्वास आहे.

   माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विकासाचे महामेरू सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मी सर्वसामान्य माणूस  उमेदवार म्हणून रिंगणात आहे.
 “शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध असल्याचे प्रशांत मार्कंडी लाडवे यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी मला सहकार्य केल्यास अख्खे पाच वर्ष शहर विकासाबरोबरच गरीब शोषित लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते सांगत असल्याचे दिसुन येत आहे.