नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला 2025 ला होत आहे.9 वर्षांपूर्वी ही निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र ती वेळेत न झाल्याने सर्वांनाच उत्सुत्कता लागली आहे. नगर परिषदेच्या सर्वच प्रभागात चुरस निर्माण झाली आहे .असे असले तरी प्रभाग 8(A) हे अनुसूचित जाती पुरुषासाठी राखीव एकमेव जागा असल्याने अनेकांची धावपळ सुरू आहे. यात भाजपच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसत आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, प्रज्योत रामटेके,दिलीप रामटेके आदीनी प्रयत्न चालविला आहे तर काँग्रेसच्या वतीने अतुल गोवर्धन यांचे एकमेव नाव सुरू आहे. त्यामुळे भाजपा काँग्रेस अशी थेट काट्याची लढत बघायला मिळणार आहे.
2 डिसेंबर रोजी होवु घातलेल्या मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं. 8 हे अनुसुचित जाती पुरूष प्रवर्गासाठी राखीव आहे, यासाठी सात इच्छुकांनी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहे, मात्र याठिकाणी प्रब्बळ दावेदार म्हणुन भाजपाचे युवा नेते प्रज्योत रामटेके आणि माजी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांच्याकडे बघितले जाते. मात्र पक्षश्रेष्टी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रज्योत रामटेेके हे प्रभाग क्रं. 8 मधील मतदार आहेत असुन 2013 पासुन भारतीय जनता पक्षात सक्रीय सभासद म्हणुन कार्य करीत आहेे. पक्षासाठी केलेल्या कार्याची तळमळ बघुन पक्षाने त्यांना सोशल मिडीयाचे मूल तालुका सयोजक म्हणुन जबाबदारी दिली. याकार्यकाळात त्यांनी पक्षाची भुमिका सोशल मिडीयाच्या माध्यमातुन घराघरात पोहचविण्यासाठी मोलाची भुमिका बजावली आहे. याकार्याची दखल घेवुन पक्षाने त्यांना विधानसभा संयोजक म्हणुन जबाबदारी दिली, याकाळात त्यांनी अतिशय उत्तम काम केलेले आहे. दुसरे भाजपचे दावेदार असलेले माजी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांनी मागील दोन वेळा नगरसेवक म्हणुन काम करीत आहेत.जनतेच्या कामासाठी नेहमीच धडपड करीत असल्याने त्यांची पक्षात चांगली छबी आहे. मात्र ते प्रभाग 4 मधील रहिवासी असल्याने प्रभागात पाहिजे त्या प्रमाणात लक्ष घालणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.कॉंग्रेस पक्षाकडुन एकमेव दावेदार असलेले अतुल गोवर्धन यांना उमेदवारी जाहिर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ते स्थानिक वार्डातील असुन नागरिकांचा त्यांना उत्तम पाठिंबा दिसत आहे. त्यामुळे या प्रभागात काँग्रेस भाजपा अशी थेट टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे प्रज्योत रामटेके व काँग्रेसचे अतुल गोवर्धन यांना उमेदवारी झाल्यास दोन्ही स्थानिक वार्डातील असल्याने अटीतटीची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
