विकासाचा ध्यास घेणारे व्यक्तिमत्व म्हणुन परिचित!
नगर परिषद मूलची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होत असून प्रभाग क्रमांक 7 हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ. माधुरी महेंद्र करकाडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्या सक्षम उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
गरिबांच्या हाकेला धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून सौ. माधुरी करकाडे यांची ओळख आहे. त्यांच्या पती महेंद्र करकाडे हे नगर परिषदेचे माजी सभापती असून माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. करकाडे दाम्पत्याच्या कार्याचा विचार करून भाजपने सौ. माधुरी करकाडे यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.
सौ. माधुरी करकाडे समाजकार्यात सक्रिय असून कुटुंब सांभाळत सामाजिक बांधिलकी जपत त्या विविध उपक्रमात पुढाकार घेतात. सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची त्यांच्या कार्यशैलीची खास ओळख असल्यामुळे मतदारांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
प्रभागातील युवक-युवतींना स्वंयरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. प्रभागातील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्या सांगतात. विशेषतः गरजू, दिन-दुबळ्या कुटुंबांना मदत करण्यासाठी त्या नेहमी पुढे असल्याने त्यांच्या प्रतिमेला अधिक सकारात्मक छटा मिळाल्या आहेत.
“नागरिकांच्या आग्रहास्तव रिंगणात उतरत असून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. जनतेच्या वैयक्तिक अडचणी मार्गी लावणे ही माझी जबाबदारी राहील,” असे सौ. माधुरी करकाडे यांनी सांगितले.
जनतेच्या आशीर्वादाने आपण निश्चितपणे विजयी होऊ, अशी त्यांची भावना असून प्रभाग 7 मधील मतदारांमध्ये त्यांच्या विजयाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
