प्रभाग 6 मध्ये नंदकिशोर रणदिवे यांनी घेतली प्रचारात आघाडी!



रवि वाळके / दे दणका न्यूज मूल 
 
नगर परिषद मूल अंतर्गत 
प्रभाग क्रमांक 6  मधील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागरिकांच्या मागास प्रवर्गातून भाजपाचे नेते तथा माजी उपाध्यक्ष नंदकिशोर मुरलीधर रणदिवे यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
  विकासपुरुष, माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. मागील सत्ता काळात ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते.रुग्णालयाचे काम असो वा शासकीय यंत्रणेचे काम असो ते काम करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे.
 गरजू व्यक्ती कामासाठी आला तर ते तत्परतेने काम करण्यास ते पुढाकार घेतात. त्यामुळे जनतेचा विश्वास वाढला आहे.प्रभाग 6 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत रणदिवे यांनी   रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा संकल्प केला आहे.

 “शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध असल्याचे नंदकिशोर रणदिवे यांचे म्हणणे आहे. एकंदरीत त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन  त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.