गरिबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे व्यक्तिमत्व !
सर्वसामान्य जनतेची नाळ ओळखुन त्यांचे दुःख दुर करून मायेची फुंकर घालणारे व्यक्तिमत्व म्हणुन नंदकिशोर मुरर्लीधर रणदिवे हे मूल शहरात प्रसिद्ध आहेत.
प्रभाग क्रमांक 6 अ मधील भारतीय जनता पक्षाच्या वतीने ते निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत.
नागरिकांच्या मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटातून रणदिवे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वासू मानले जातात.
गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले नंदकिशोर रणदिवे हे सतत कामात तत्पर असुन मदतीचा हात पुढे करणारे म्हणून परिचित आहेत. रणदिवे निवडून आल्यास आपली कामे त्वरित होतील असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत.
नगर परिषद मूल येथे मागील सत्ता काळात ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते.रुग्णालयाचे काम असो वा शासकीय यंत्रणेचे काम असो ते काम करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे.
गरजू व्यक्ती कामासाठी आला तर ते तत्परतेने काम करण्यास त्यांच्या हातखंड असल्याने लोकांचे सतत त्यांच्याकडे जाणे असते. काम तत्परतेने होत असल्याने जनतेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होत असल्याने मानसिक समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. त्यामुळे जनता त्यांचेवर खुष आहे.
गरीब, दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, रुग्णांना मदत असो वा शैक्षणिक सुविधा—ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहत असल्याने त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग 6 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत रणदिवे यांनी विकासाचा आराखडा तयार केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करून जनतेला मूलभूत असलेल्या सोई अग्रक्रमाने देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विकासाचे महामेरू सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मी उमेदवार म्हणून रिंगणात आहे.
“शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध असल्याचे नंदकिशोर रणदिवे यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी मला सहकार्य करावे मी मूल शहर विकासाबरोबरच गरीब शोषित लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी कटिबद्ध असुन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत.
गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे नंदकिशोर रणदिवे यांनी मागील केलेल्या कामाबाबत समाधानी असुन यावेळी पुन्हा नंदु भाऊ! अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्कीच असल्याचे बोलले जात आहे.
