नगर परिषद मूलच्या प्रभाग 5 मध्ये ऋतिक दिनेश गोयल यांनी घेतली प्रचारात आघाडी!




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
   
  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने  यावेळी प्रभाग 5 मध्ये युवा तथा प्रबळ इच्छा शक्ती असलेल्या ऋतिक दिनेश गोयल यांना उमेदवारी दिल्याने अनेक युवकांच्या आशा उंचावल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ऋतिक दिनेश गोयल राजकारणातून समाजकारण करून समाजातील दिन , दुबळ्या,शोषित व्यक्तींना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. मूल शहर सुंदर शहर व्हावे यातुन शहराचा,प्रभागाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी ते नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे युवकापासून तर आबालवृद्धांपर्यंत ऋतिकला पसंती मिळत आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेत विजयाकडे घोडदौड करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नगर परिषद मूल  अंतर्गत येणाऱ्या प्रभाग 5 मध्ये सर्वसाधारण गटातून ऋतिक दिनेश गोयल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री, काँग्रेसचे गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगणात उतरले आहेत.
 ते  स्वतः युवा असुन मूल शहरात विकास घडवुन आणण्याचा संकल्प केल्याने युवा वर्ग  त्याच्या पाठीशी उभा आहे.जेसीआय या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी समाजकार्य सुरू केले. आपला जन्म ज्या जन्म भूमीत झाला. त्या जन्मभूमीचे काही देणे लागते ही भावना मनात ठेऊन काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने ते रिंगणात उतरले आहेत. ऋतिकचे वडील दिनेश गोयल हे मोठे व्यापारी असुन जनमानसात त्यांची प्रतिमा उत्तम आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याने 
त्यांना पैशाचा मोह नाही. त्यामुळे मनात शहराचा बदल घडवुन आणण्याचा त्यांचा ध्यास पदोपदी जाणवताना दिसत आहे. ज्यांना समाजाचे हित लक्षात आहे ते समाज परिवर्तन नक्कीच घडवुन आणतात हे आजपर्यत बघितले आहे. त्यामुळे ऋतिकच्या रूपाने मूल नगराचा नवा बदल घडवुन आणण्यासाठी मतदार त्यांच्या बाजूने कौल देतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन विजयश्री खेचुन आणण्यास ऋतिक नक्कीच यशस्वी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.