प्रभाग 5 मधील ऋतिक दिनेश गोयल प्रबळ उमेदवार!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
 नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबर ला होत आहे. यावेळी काँग्रेस पक्षाने दमदार व प्रबळ उमेदवार दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत प्रभाग 5 मध्ये जेसीआय या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या माध्यमातुन सामाजिक कार्याला सुरुवात केलेले ऋतीक दिनेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे. ऋतिक गोयल यांचे वडील दिनेश गोयल हे व्यापारी असुन जनमानसात त्यांची प्रतिमा उत्तम आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेली ही उमेदवारी भाजपाच्या उमेदवाराला टक्कर देणार आहे. नगर परिषदेत अशा होतकरू युवकांचा प्रवेश मूल शहर विकासाला चालना देईल अशी जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ऋतिक दिनेश गोयल यांचा विजय निश्चित मानला जात आहे.



मूल नगर परिषदेची निवडणुक येत्या 2 डिसेंबर रोजी होवु घातली आहे. सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रं. 5 ब या राखीव गटातुन ऋतीक गोयल  आपली उमेदवारी अर्ज दाखल दाखल करणार आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते, राज्याचे सरचिटणीस संतोष रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्वात ऋतीक गोयल यांनी काही दिवसापुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यामागे मागे मोठी युवाफळी असल्याने विजयाची पताका रोवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.