गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित!
रवी वाळके/दे दणका न्यूज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण गटातून मिथुन (नितिन) प्रकाश गद्देवार या सक्षम उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे.
येत्या 2 डिसेंबरला निवडणूक होत आहे.ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा प्रभागात सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मिथुन (नितिन ) प्रकाश गद्देवार
यांना उमेदवारी दिल्याने मतदार समाधान व्यक्त करीत आहेत. सतत कामात तत्पर असलेला कार्यकर्ता म्हणून मिथुन(नितिन) यांची ओळख आहे . त्यामुळे हे निवडून आल्यास आपली कामे त्वरित होतील असा विश्वास मतदाराना आहे.
गोर गरिबांची सेवा करणे हे आपले कर्तव्य असुन आजही फुल ना पाकळी म्हणून मदतीचा हात पुढे केला जात आहे. यापुढेही मतदारांनी सहकार्य केल्यास कुणीही गरजू व्यक्ती माझ्याकडून रिकामा जाणार नाही असे सांगत गरीब व गरजू व्यक्तीची सेवा हेच आपण ब्रिद वाक्य जोपासण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठामपणे सांगितले.
समाजातील
लोकांमध्ये चांगली छबी निर्माण असल्याने भविष्यात आपले काम होणार म्हणून मिथुन (नितिन) गद्देवार यांचेकडे बघितले जात आहे.
सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत मिथुन ( नितिन) गद्देवार
यांनी विकास साधण्याचा संकल्प केला आहे.
रुग्णालयाचे काम, गरिबांना मदत,रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे.
माजी मंत्री , विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोष भाऊ रावत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जात आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वासावर व आपल्या कार्याने मतदारांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे.
मी जनसेवेचे व्रत घेऊन रिंगणात उतरलो असुन जनसेवेला परम धर्म मानला आहे. त्यामुळे जनसामान्याचा आशीर्वाद नक्कीच मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
“शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत माझ्या कार्याचीच पावती विजयाकडे नेईल अशी आशा व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आशीर्वादाने मला सहकार्य मिळाल्यास अख्खे पाच वर्ष शहर विकासाबरोबरच गरीब शोषित लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी कटिबद असणार असल्याचे मिथुन (नितिन) प्रकाश गद्देवार यांनी म्हटले आहे.
