नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या प्रभाग 2 चा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार रुपेश निकोडे यांच्या सहचारिणी सौ. अश्विनी रुपेश निकोडे व याच प्रभागातील सर्वसाधारण गटातून सूरज रमेश मांदाडे यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार सक्षम असुन प्रचारात आघाडी घेतल्याचे लोकांच्या चर्चेतून दिसुन येत आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपाचा झेंडा रोवला जाईल असे बोलल्या जात आहे .
मूल नगर परिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबर ला होत असुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.
सौ. अश्विनी रुपेश निकोडे व सूरज रमेश मांदाडे या उमेदवारी देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी ही उमेदवारी देत जनतेच्या समस्या यासाठी राज्याचे माजी मंत्री, विकास पुरुष तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उमेदवारी मोठ्या विश्वासाने दिली असल्याने या दिलेल्या संधीचे सोने करण्यात येईल अशी ठाम भूमिका या दोन उमेदवारांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपची सत्ता आली तर प्रभागाचा नक्कीच विकास करता येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.नेहमी समाज हित जोपासणारे हे दोन्ही उमेदवार असल्याने लोकांच्या समस्या नक्कीच सुटतील अशी आशा सर्वांना आहे. सध्या प्रचारासाठी घरोघरी भेट दिली जात असताना लोकांचा या दोघांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या जनतेच्या प्रतिसादाने हे दोघेही दोन्ही निवडून येतील असे बोलल्या जात आहे.
