नगरपरिषद निवडणूक 2025 : काँग्रेसच्या एकता समर्थ यांच्या उमेदवारीला अभूतपूर्व जनसमर्थन! समर्थ दांपत्याच्या जनसंपर्काची शहरभरात जोरदार चर्चा !




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकाधिक रंगतदार होत असताना काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ यांना मिळत असलेले अभूतपूर्व जनसमर्थन सध्या शहरात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पती आणि माजी सभापती प्रशांत समर्थ यांच्या आक्रमक आणि नियोजनबद्ध जनसंपर्क मोहिमेमुळे समर्थ दांपत्याची जोरदार हवा संपूर्ण शहरात जाणवत आहे.

शहरातील असा एकही भाग उरलेला नाही जिथे प्रशांत समर्थ यांच्या कार्यांची, त्यांच्या संपर्क मोहिमेची, तसेच एकता समर्थ यांच्या नेतृत्वक्षम व्यक्तिमत्त्वाची चर्चा होत नाही. गल्लीपासून मुख्य रस्त्यापर्यंत, बाजारपेठेपासून वॉर्डापर्यंत "एकता समर्थ" हे नाव मतदारांच्या चर्चेत ठळकपणे ऐकू येत आहे. समर्थ दांपत्याचे दौरे, सभांमधील उपस्थिती, महिलांशी संवाद, युवावर्गातील पकड यामुळे त्यांचा जनाधार वेगाने वाढत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

दरम्यान, एकता आणि प्रशांत समर्थ यांना सर्व स्तरांतून मिळणाऱ्या या उदंड प्रतिसादामुळे विरोधक चांगलेच दबावात आले असल्याचे समोर येत आहे. पराभवाची भीती विरोधकांना सतावत असल्याचे त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट दिसत असून, शहरातील राजकीय वातावरणात यातून नवा वेग निर्माण झाला आहे.

एकूणच, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने झुकत आहे, याचे संकेत आता स्पष्ट दिसू लागले असून समर्थ दांपत्याची लाट संपूर्ण निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.