नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होत आहे. या प्रभागात प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण गटातून मिथुन (नितिन) प्रकाश गद्देवार व नागरिकाचा मागास प्रवर्ग मधून सौ. शालू किसन शेरकी निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव संतोषभाऊ रावत यांच्या मार्गदर्शाखाली
रिंगणात उतरविण्यात आले आहे. दोन्ही उमेदवार सक्षम असुन प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार प्रभागातील असल्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास असल्याने मतदारांनी दोघांनाही पसंती दर्शविली आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट असल्याने यासाठी नगर परिषदेचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत समर्थ यांच्या सहचारिणी सौ. एकता प्रशांत समर्थ या रिंगणात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून एकहाती सत्ता असल्याने जनता कंटाळली आहे. त्यामुळे आता बदल हवा अशी जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. मिथुन (नितिन) गद्देवार व सौ. शालू शेरकी यांचा स्थानिक प्रभाग असल्याने जनता विकासाच्या दृष्टीने दोघांनाही पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मिथुन गद्देवार व सौ. शालू शेरकी यांचे पारडे जड दिसत आहे. असाच प्रचार राहिल्यास विजय निश्चित होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
