नगर परिषद मूल च्या निवडणुकीत प्रभाग 2 मधील दमदार उमेदवार सौ. अश्विनी रुपेश निकोडे!


पतीच्या खांद्याला खांदा लावुन समाजकार्य करण्याचा संकल्प!


रवि वाळके/ दे दणका न्यूज मूल 
    
नगर परिषद मूल ची निवडणूक येत्या 2 डिसेंबर ला होत असुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील सामाजिक बांधिलकी जपणारे युवा नेतृत्व रुपेश निकोडे यांच्या सहचारिणी सौ. अश्विनी रुपेश निकोडे ह्या 
 प्रभाग 2 अ ओबीसी महिला राखीव मधुन रिंगणात आहेत. 
रुपेश निकोडे हे युवा कंत्राटदार असुन सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सामाजिक कार्यासाठी घरी येणाऱ्या अनेक व्यक्ती सोबत होत असलेले संवाद बघून आपणही सामाजिक कार्य करावे अशी प्रेरणा अश्विनी निर्माण झाली. याच दरम्यान नगर परिषद मूल ची निवडणूक जाहीर होताच याच निवडणुकीच्या माध्यमातून वार्डातील सर्वसामान्य जनतेला न्याय देता येईल ही इच्छा निर्माण झाली. बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे बुलंद आवाज माजी मंत्री तथा आमदार सुधीर 
मुनगंटीवार यांनी विश्वास ठेऊन 
प्रभाग 2 मध्ये उमेदवारी दिली आहे. या मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असुन सामाजिक हिताचे निर्णय घेऊन वार्ड विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे.
नेहमी समाज हित जोपासणारे म्हणुन त्यांची ख्याती असलेले रुपेश निकोडे हे गरीब, दिन दुबड्या लोकांची सेवा करण्यात ते नेहमी पुढाकार घेत असतात. वार्डातील सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आपण नागरिकांच्या आग्रहास्तव रिंगणार असल्याचे त्यांच्या सहचारिणी सौ. अश्विनी रुपेश निकोडे यांचे म्हणणे आहे.
वार्डाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी जनतेच्या सहकार्याने सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार 
 यांच्या मार्गदर्शनाखाली मूल शहर विकासाकडे वाटचाल करणार आहे. शहरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जनतेनी कौल दिला तर नक्कीच बदलाचे वादळ निर्माण होईल असा विश्वास आहे. यासाठी आपले सहकार्य द्या, मी वार्डाचा 
विकास देईन असा विश्वास या निमित्याने सौ. अश्विनी रुपेश निकोडे यांनी दिला आहे.