मूल नगर परिषद निवडणूक : प्रभाग 1 मधील अजय सुधाकर गोगुलवार दमदार उमेदवार!


  प्रचारात घेतली आघाडी !





रवि वाळके / दे दणका न्यूज मूल 
 
 मूल नगर परिषदेची निवडणुक येत्या 2 डिसेंबर ला होत असून 
प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण गटातून श्री. अजय सुधाकर गोगुलवार 
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ते निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत असुन प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे.
    श्री.अजय सुधाकर गोगुलवार हे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व असुन भारतीय जीवन विमाच्या माध्यमातून अनेक लोकांना लाभ मिळवुन दिला आहे. जनतेची सेवा करता यावी यासाठी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आग्रहास्तव ते निवडणुकीत उभे आहेत.मतदान रुपी जनतेचा प्रतिसाद मिळाला व निवडून आले तर आमदार मुनगंटीवार यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक समस्या नक्कीच सोडवतील  असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत.
    
 
नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या 
प्रभाग 1 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आपले कर्तव्य असुन त्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे सांगत आहेत. त्यामुळं त्यांनी प्रभाग  विकासाचा आराखडा तयार केला आहे.  रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करून जनतेला मूलभूत असलेल्या सोई अग्रक्रमाने देण्याचा त्यांचा  संकल्प आहे.

   
 “शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करू असे 
 अजय गोगुलवार यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी मला सहकार्य करावे मी  मूल शहर विकासाबरोबरच गरीब शोषित लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहेत.
आहे. अजय  गोगुलवार यांचे एकुण कार्य बघता समाधानकारक व्यक्तिमत्व असल्याने त्यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. डोअर टू डोअर जाऊन मतदारांशी संवाद साधत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन विजय निश्चित मानला जात आहे.