चिचापल्लि वनपरिक्षेत्रात बाईक रॅली व अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम, वन्यजीव सप्ताह उत्साहात!





रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 


चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत वन्यजीव सप्ताह निमित्त संपूर्ण आठवडाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .वन्यजीव सप्ताह च्या शेवटच्या दिवशी वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली येथुन सर्व वनाधिकारी व कर्मचारी यांची बाईक रॅली अजयपूर, महादवाडी, आगडी, कांतापेठ, चीरोली, खालवसपेठ,उथळपेठ, नलेश्वर, दहेगाव, हळदी, चिचाळा, ताडाळा मार्गे  कर्मवीर महाविद्यालय मूल येथे पोहोचली. महाविद्यालयातील कन्नमवार सभागृहात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपल्या मनोगता द्वारे  चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी सौ.एस.व्ही. महेशकर मॅडम व महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ वाळके मॅडम यांनी वन्यजीवांचे जंगलातील महत्व आणि पर्यावरण विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व श्री संतोष कुंदोजवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयी कार्यक्रम सादर केले...या कार्यक्रमाला परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड मॅडम, क्षेत्र सहाय्यक,केळझर, श्री एम.आर.निमकर, क्षेत्र सहाय्यक, चिचपल्ली, श्री चौरे, वनरक्षक श्री सुधीर ठाकुर, वनरक्षक श्री अनिल नाडमवार, वनरक्षक श्री धुळगुंडे, वनरक्षक कु.गेडाम, वनरक्षक कु.ठमके, वनरक्षक श्री येसांबरे, वनरक्षक कु. वासनिक, वनरक्षक श्री मडावी, वनरक्षक श्री नैताम, वनरक्षक श्री बावणे, वनरक्षक श्री गेडाम, वनरक्षक श्री दुपारे, वनरक्षक कु. पाटील, वनरक्षक सौ गेडाम तथा संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य व वनमजूर उपस्थित होते.