मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र प्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या दाबगाव मक्ता गावात अस्वलाचा दहशत माजली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दररोज रात्री सुमारे नऊ वाजता अस्वल ग्रामपंचायत जवळील चौकात दिसत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अस्वल गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे गावात येत असून ते नेहमी वर्दळीच्या ठिकाणी फिरत असल्यामुळे मुलं आणि वृद्ध व्यक्ती घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. “अस्वल कधी हल्ला करेल सांगता येत नाही, त्यामुळे गावात सतत तणावाचे वातावरण झाले आहे
अस्वलाला हुसकावून लावण्यासाठी रात्री आगीचे गोळे पेटवून गावकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र तो निष्फळ ठरत आहे. वनविभागाने यावर तातडीने लक्ष देऊन अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
