माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी जाणुन घेतल्या वळण मार्गाच्या कामाचा माहिती !
मूल शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वळण मार्गाचा प्रश्न गेल्या 12 वर्षापासुन रेंगाळत आहे . काही मोजक्याच खातेदारांच्या शेतीची रजिस्ट्री शिल्लक असल्याने वळण मार्गाचा प्रश्न कायम आहे. सदर रस्त्याच्या कामाची माहिती जाणुन घेण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या दालणामध्ये भेट घेवुन सदर रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मागणी केली, दरम्यान उपविभागीय अधिकारी चरडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उर्वरीत शेतकऱ्यांच्या शेतीचे सक्तीचे भुसंपादन करण्यासाठी दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहे.
चंद्रपूर-मूल-गडचिरोली या रस्त्याला जाणाऱ्या या मूल शहर वळण मार्गाचे काम सन 2013 पासुन प्रस्तावित आहे, परंतु अजुनही कामाला सुरूवात होत नसल्याने भाजपाच्या जेष्ठ नेत्या, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी बुधवारी मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांची भेट घेवुन 12 वर्षापासुन वळण मार्गाच्या कामाची स्थिती ऐकुण घेतल्या. चंद्रपूर-मूल-गडचिरोली रस्त्याला जोडणारा हा मार्ग 6.200 किमी चा आहे. यामार्गाचे काम सुरू करण्यासाठी 87 प्रकरण पुढे आलेली होती, त्यापैकी 74 प्रकरणाची रजिस्ट्री पुर्ण झालेली आहे, तर 6 प्रकरणाचे धनादेश प्राप्त झालेले आहेत, केवळ 7 प्रकरणामध्ये वारसान आणि अंतर्गत वाद असल्यामुळे यामार्गाचे काम थंडबस्तात असल्याची बाब पुढे अली. यावेळी श्रीमती फडणवीस यांनी यामार्गाचे काम लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली, दरम्यान उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दुष्यांत साखरे यांना उर्वरीत शेतकऱ्यांच्या शेतीचे सक्तीचे भुसंपादन करण्यासाठी दोन दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहे.
यावेळी मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, शाम उराडे, विपीन भालेराव, संदीप मोहबे, विवेक मुत्यलवार, निहाल गेडाम आदी उपस्थित होते.
