जुनासुर्ला येथील शेतात आढळला १३ फूट लांबीचा अजगर!




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
मूल तालुक्यात शेतीचा हंगाम  सुरू असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला आहे. मुल  तालुक्यातील जुनासुर्ला येथील संजय आकुलवार यांच्या शेतात काम सुरू असताना १३ फुट लांबीचा अजगर साप दिसला . याबाबत मूल चे प्राणी मित्र उमेशसिंग झिरे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी 
 संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, दिनेश खेवले व तरूण उपाध्ये यांना पाठविण्यात आले.या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने त्या १३ फूट लांबीच्या अजगराला 
पकडले.वनविभागाच्या उपस्थितीत या अजगर सापाची नोंद करून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार आहे. यावेळी जुनासुर्लाचे सरपंच रणजित समर्थ , शेत मालक संजय आकुलवार व ग्रामस्थ उपस्थित होते. अजगर शेतात असल्याची माहिती कळताच बघण्यासाठी गावातील  ग्रामस्थानी 
 गर्दी केली होती.