मूल शहरातिल मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन



नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांचा इशारा



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
मूल शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या विरोधात नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष  नंदकिशोर रणदिवे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास नगर परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
    चंद्रपूर गडचिरोली महामार्ग मूल शहरातून जात असल्याने या मार्गावर जनावरे मोठ्या प्रमाणात बसून असतात. त्यामुळे ये जा करणाऱ्या लहान व मोठ्या वाहन धारकाना मार्ग काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
 शहरात मुख्य रस्त्यांवर बसलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास होत आहे.याबाबत त्वरीत कारवाई करण्याची  8 सप्तेबर 2025 ला मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे.या निवेदनप्रसंगी नंदकिशोर रणदिवे यांच्यासोबत नगर परिषदेचे माजी सभापती अनिल साखरकर, भाजपा महामंत्री प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे, सुधीर भोयर, राहुल जिरकुंडवार, आशिष गुंडवार, गोपाल बल्लावार तसेच बरेच नागरिक उपस्थित होते.