सार्वजनिक बांधकाम विभाग मूल ने लक्ष
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
मूल तालुक्यातील मूल - दाबगाव मक्ता - बल्लारपूर रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल अंतर्गत तयार करण्यात आला. मात्र दाबगाव मक्ता येथील बौद्ध विहारा जवळ रस्त्याचा काही भाग सोडुन देण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात मोठा खड्डा पडला असुन अपघाताला निमंत्रण होत आहे. गावावरून दोन्ही बाजूकडून जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने काढण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
मूल वरून बल्लारपूर राजुरा कडे जाणारी वाहने दाबगाव मक्ता मार्गाने जात असतात.
याच गावाजवळील बौद्ध विहारा जवळ रस्ता तयार करण्याचे काम सोडून देण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात मोठा खड्डा पडला असुन या मार्गावरून वाट काढणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी
येणाऱ्या वाहन धारकांना हे खड्डे दिसत नसल्याने अनेक दुचाकी वाहन धारकांचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यासंदर्भात वेळोवेळी खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल चे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल ने लक्ष न दिल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा जनतेनी दिला आहे.
