*आदर्श सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार*.
मूल/दे दणका न्यूज
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन् यांचा जन्म दिवस सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आपले शैक्षणिक कार्य सांभाळून सामाजिक कार्यात आपली अमीट छाप निर्माण करणाऱ्या *आदरणीय प्रा. चंद्रकांत मनियार, आद.युवराज चावरे सर, आद.विजय वैरागडवार सर* या सेवानिवृत्त गुरूवर्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे *अध्यक्ष म्हणून मान ग्रामगीताचार्य, ह.भ.पा.शरदजी सहारे महाराज तर प्रमुख उपस्थिती आदरणीय सर्वश्री प्रा.महेश पानसे,माजी सभापती प्रशांत समर्थ,मिलिंद खोब्रागडे,ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले,ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर,अशोकराव कडुकार,संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप,मनिष येलट्टीवार,डेव्हिड खोब्रागडे, नरेंद्र कामडी,सौ. इंदुताई मडावी,सौ.गायत्री मडावी,* आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक वृंद, समितीचे पदाधिकारी आणि सदस्य व विद्यार्थी आदी उपस्थित होते *संचालन सहाय्यक शिक्षिका कु. रिना मसराम, प्रास्ताविक राजु गेडाम तर उपस्थितांचे आभार बंडु अल्लीवार* यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल मुंगमोडे सर, अजय राऊत सर संकेत जाधव यांनी परिश्रम घेतले.