रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या प्रतीक्षेचा शेवट अखेर होत असून १ ऑक्टोबर २०२५ पासून सफारीला प्रारंभ होत असुन मूल वनपरिक्षेत्रातील दोन गेट मधुन ३२ सफारी. गाड्या धावणार आहेत.
पावसाळ्यामुळे काही महिन्यांपासून बंद असलेली ही सफारी हंगामातील मोठे आकर्षण ठरणार आहे.
मूल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत सोमनाथ व केसलाघाट ही दोन गेटं पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. प्रत्येक गेटवरून १६ सफारी गाड्यांना प्रवेश मिळणार असून एकूण ३२ सफारी गाड्या रोजच्या फेरफटक्यासाठी सज्ज असतील.
यंदा सफारीच्या शुल्कात बदल करण्यात आला असून कोअर व बफर क्षेत्रातील तिकिटांमध्ये जवळपास १ हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तरीही, दिवाळीच्या सुट्ट्या व हिवाळी सहलींचा काळ जवळ आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक ताडोबाला भेट देतील, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
ताडोबाच्या सफारीत पर्यटकांना वाघाचे दर्शन नक्कीच घडते, असा ठाम विश्वास प्रवाशांचा असून यामुळे जगभरातील वन्यजीवप्रेमींचे लक्ष या व्याघ्र प्रकल्पाकडे वेधले गेले आहे.
हंगामाचा प्रारंभ – उत्सुकतेचा शिगोशा
पर्यटकांसाठी ताडोबातील सफारी ही रोमांचक अनुभवाची पर्वणी असते. वाघ, बिबट्या, रानगवा, हरीण यांच्यासह निसर्गसंपन्न अरण्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होत असतात. त्यांच्यासाठी पर्यटनाची खास मेजवानी म्हणजे वन्यप्राण्यांचे दर्शन राहणार आहे, हे विशेष.
