विकासाचे महामेरू म्हणुन ख्याती असलेले माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनात केलेल्या असंख्य सामाजिक, शैक्षणिक, रोजगार क्षेत्रात केलेल्या विविध कामाची दखल घेत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला, आदरणीय सुधीरभाऊ यांनी राजकारण हे पक्षीय न ठेवता , कोणताही भेदभाव न करता प्रत्येक जनसामान्यांना लाभ कसा पोहचवता येईल हाच उदात्त हेतू ठेवला,अश्या या महान व्यक्तिमत्वाचा भारतीय जनता पार्टी मुल शहर व तालुक्याच्या वतीने मुल येथे मा.सां. कन्नमवार सभागृहात दिनांक 13 सप्टेंबर 2025 ला दुपारी 3:00 वाजता भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या सत्कार सोहळ्यात तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक व व्यापारी संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या सत्कार सोहळ्यात घरगुती व सार्वजनिक गणपती स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिषजी शर्मा,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमती संध्याताई गुरनुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,तालुक्यातील सर्व जनतेने या सत्कार सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी मूल शहर व तालुक्याच्या वतीने केलेले आहे.
