चिरोली उपकेंद्रात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने पोभुर्णा येथे करावे लागत आहे जनतेला उपचार!

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही होत आहे दुर्लक्ष 




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

ग्रामीण भागातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली माञ वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने लांब अंतरावर असलेल्या पोभुर्णा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये इमारत व कर्मचाऱ्यावर खर्च केले जात असताना मात्र जनतेला योग्य उपचार मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी रामेश्वर बावणे यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेनी केला आहे.

 मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १८ गावे येत असुन विविध आजाराच्या उपचारासाठी जनता येत असते. दोन वैद्यकिय अधिकाऱ्याचे पद भरले आहे. 
ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यांना लांब अंतरावर जाऊन उपचार करणे कठीण असते. यासाठी गावा जवळच उपचार करता यावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. चिरोली उपकेंद्रांतर्गत
अंतर्गत १८ गावे येत असुन यात चिरोली, जानाळा, फुलझरी, आगडी, कांतापेठ, टोलेवाही, केळझर, खालवसपेठ, सुशीदाबगाव , दाबगाव मक्ता, नलेश्वर, भगवानपूर, व इतर गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात. त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकिय यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे.
 रुग्णांवर उपचार सुरू असले तरी ही उपाययोजना तोतडी स्वरूपात आहे. सध्या तापाची साथ असल्याने आरोग्य यंत्रणा व्यवस्थित ठेवण्याची गरज तालुका वैद्यकीय अधिकारी रामेश्वर बावणे यांची आहे. मात्र ते चंद्रपूर वरून ये जा करतात.कार्यालयात वेळेवर येत नाही.उपकेंद्रांतर्गत असलेल्या रुग्ण कल्याण समित्यांच्या सभा घेत नाहीत. त्यामुळे गावात आरोग्यविषयक समस्या सोडवण्यास येत नाहीत. फक्त नाममात्र कार्यालयात येऊन कागदे रंगविण्याचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी जनतेत रोष निर्माण झाला आहे. आजच्या घडीला तापाची साथ असल्याने चिरोली उपकेंद्रात योग्य उपचार होत नसल्याने या परिसरातील गावातील जनता पोभुर्णा येथे जाऊन उपचार घेत आहेत.जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून टाळूवरचे लोणी खाणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी मूल यांचेवर कारवाई करण्यात यावी.
याकडे जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी जनतेनी केली आहे.

अंबादास  आदे  नागरिक दाबगाव मक्ता:- 
   
 गरीब जनतेला योग्य उपचार मिळावे यासाठी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. सध्या तापाची साथ सुरू असल्याने योग्य उपचार करणे आवश्यक होते मात्र येथील वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नसल्याने पोभुर्णा येथे जाऊन उपचार करावे लागले आहे. गरिबांकडे लक्ष देत नसल्याचे दिसुन आले आहे. सर्व रुग्णांना योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी सज्ज राहण्याची गरज आहे.