५० वर्षाची परंपरा आजही कायम!
देशात घडणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर देखावे तयार करून जनमानसात जनजागृती करणारे गणेश मंडळ म्हणजे सुभाष नगर वार्ड न.८ मूल मधील संगम गणेश मंडळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दरवर्षी विविध पुरस्काराने या मंडळाला सन्मानित केल्या जाते. या वर्षी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत देखाव्याच्या माध्यमातून जनमानसात जनजागृती करण्याचा निर्णय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेत देखावा तयार केला आहे. यात चंद्रयान वरील देखावा व ऑपरेशन सिन्दुर यावर विशेषतः दृश्य साकारले असल्याचे दिसून येत आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक अविनाश बंडावार यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या पहेलगाम हल्ल्यातील देखाव्यात मंडळाचे अध्यक्ष पिंटू कामडे,उपाध्यक्ष,बंटी खोब्रागडे,सचिव,सुमित नवघडे ,सदस्य,अमित पोलजवार या युवा कार्यकर्त्याच्या देखरेखीखाली केले जात आहे. मुंबई येथील १९/११ चा हल्ला असो की मागील वर्षी कलकत्ता येथील मोमीता हत्याकांड असो हुबेहूब दृश्य साकारण्याचा हातखंड संगम गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यात आहे. मागील वर्षी देखील मंडळाला सन्मानित करण्यात आले आहे. पहेलगाव येथे झालेल्या हल्ल्याबाबत ऑपरेशन शिंदूर चे दृष्ट दाखविण्यात आले आहे.मंडळाचे ५० वे वर्ष असुन या वर्षात जनतेला प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न खरोखरच दिशा देणारा ठरणार आहे.
