क्रांती दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट ला गुरुदेव सेवा मंडळ मोझरी यांच्या वतीने क्रांती ज्योत यात्रा अनेक गुरु भक्ताच्या समवेत निघाली.आज सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळाचे क्रांतीज्योत प्रमुख इंजिनिअर सुशील बुरडे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी अशोक चरडे, ग्राम गीताचार्य गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले, गुरुदेव सेवा मंडळ मूलचे अध्यक्ष चेतन कवाडकर, सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलचे मुख्याध्यापक अविनाश जगताप आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांचे योगदान व १९४२ मधील राष्ट्रीय चळवळ या विषयावर उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन चेतन कवाडकर, प्रास्ताविक श अविनाश जगताप तर आभार प्रदर्शन रिना मसराम हिने मानले.
