ग्रामीण भागातील अंगणवाडी बालक पौष्टिक आहाराने बनणार सुदृढ !


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने तो आरोग्याच्या दृष्टीने सक्षम राहणे आवश्यक आहे . त्यामुळे मूल तालुक्यातील सर्वच अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या सर्व बालकांना शासनाकडून प्राप्त होत असलेला पौष्टीक आहार देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. याकडे बालप्रकल्प कार्यालय मूल येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी कार्यकर्ती विशेष लक्ष घालत आहेत.
त्यामुळे सर्वच बालके सक्षम व सुदृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
      देशाची सक्षम पिढी निर्माण करायची असेल तर लहान बालकांना बालवयातच पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. याच बरोबर पूर्व प्राथमिक शिक्षणातील बौद्धिक क्षमता विकसित होणे आवश्यक असल्याने यासाठी अंगणवाडी सेविका यांची महत्वाची भूमिका पार पाडत असते. मूल तालुक्यात असलेल्या अंगणवाडी केंद्राला मोट, वटाणा, चना व इतर कळधान्यातून पौष्टिक आहार सर्व बालकांना देण्यात यावा अशी सक्त ताकीद  बाल प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे ते 
वेळोवेळी भेट देऊन मागोवा घेत आहेत . त्यामुळे अंगणवाडी केंद्राचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष घातले जात आहे. त्यामुळे बालकांना शासनाने ठरवून दिलेला पौष्टिक आहार नियमित दिला असल्याने बालकांची शारीरिक वाढ होण्याला वाव मिळत आहे. आजच्या घडीला शासनाच्या वतीने प्रत्येक गावात अंगणवाडी केंद्राची इमारत बांधण्यात आली असुन  त्यात बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी केंद्राचा परिसर बालकांच्या शैक्षणिकदृष्ट्या पोषक असल्याने बालकांच्या उन्नतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सातत्यपना कायम राहिला तर कुणीही बालक कुपोषित न राहता सक्षम व सुदृढ बालक निर्माण करण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपली मुले आहेत ही भावना जोपासत काम केले तर भविष्यकाळात सुदृढ बालक नक्कीच निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

निलेश चव्हाण, बाल प्रकल्प अधिकारी मूल:- अंगणवाडी केंद्रातील सर्व बालकांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी अंगणवाडी केंद्राला वेळोवेळी भेट दिली जात असते. तसेच बालकांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बालकांची शारीरिक क्षमता नक्कीच विकसित होईल.