करतांना मूल पोलिसांनी मुद्देमालासह पकडली दारू !
१ लाख ३६ हजार रुपयाची दारू जप्त
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
मूल मारोडा मार्गावरील काटवन टी पॉईंट वर मूल पोलिस नाकाबंदी करीत असताना
पांढऱ्या रंगाची मारोती ८०० क्रमांक एम एच २७ ६०५० जाताना दिसली असता पोलिसांनी थांबवुन पाहणी घेतली असता देशी दारुच्या ३४ पेटया आत मध्ये असल्याचे आढळल्या. यावेळी पोलिसांनी चालक मालक शंकनाथ दिलीप टिंगूसले, वय (25) वर्षे, आणि त्याचा सहकारी अमन अनिल टिंगूसले वय (22) वर्षे, रा. मूल दोघेही वार्ड नंबर ८ मधील रहिवासी आहेत.या दोन्ही आरोपीं विरुदध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यात १ लाख ३६ हजार रुपये किंमतीची देशी दारु आणि पांढ-या रंगाची मारोती ८०० असा एकूण २ लाख ११ हजार रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरिक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी यांचेसह पोलिस हवालदार भोजराज मुंडरे, पोलिस अंमलदार नरेश कोडापे, चिमाजी देवकते, शंकर बोरसरे यांनी केली. मूल या कारवाईने अवैधरित्या दारुची वाहतूक व विक्री करण्यां-यांचे धाबे दणाणले आहे. अधिक तपास मूल पोलिस करीत आहेत.